एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली आणि…. राज ठाकरेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारीनेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. इतकेच नाही तर यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कलही केली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आजारी असल्याचे सांगायचे. स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी मिळेल तो हात हातात घेतला आणि नंतर ते कोपऱ्यात जाऊन बसले, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, काल-परवा मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या (उद्धव ठाकरेंची नक्कल), एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली आणि आता ते सगळीकळे फिरत आहेत, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. त्यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मागे कोपऱ्यात जाऊन बसायचे, हे असले धंदे मी करत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच, हे लोक करणार काहीच नाही, मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? कारण त्यांनी कधीच भूमिका घेतली नाही. फक्त पैशांसाठी, स्वार्थासाठी कधी हा तर कधी तो. पण बस मला सत्तेत बसवा, असेदेखील राज ठाकरे उद्धव ठाकरेंची नक्कल करत म्हणाले. दरम्यान, रझा अकादमीने मुंबई महिला पोलिसांवर हात उचलला तेव्हा कोणतेही काम न करता हिंदुत्व करणे, बसलेले आणि बसणारे कुठे होते? या लोकांना काहीही देणेघेणे नाही, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

Team Global News Marathi: