कोकणासह मध्य महाराष्ट्रात येत्या 24 ते 38 तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुसळधार कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा राज्यावर दाटून आला आहे. पुढच्या 24 ते 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस आणि जोरदार वाऱ्यांनी महाराष्ट्रासह मुंबईची दयनीय अवस्था करून टाकली होती. आता मुंबईसह कोकणात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मुंबईत गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पाऊस झाला. मुंबईबरोबरच ठाणे, रायगड आणि संपूर्ण कोकणात पावसानं थैमान घातलं. पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस झाला होता. मागचे दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि आता पुन्हा मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: