आरोग्य भरती घोटाळा प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांना अटक

आरोग्य भरती पेपर फुटीप्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते तसेच याच मुद्द्यवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहे. अशातच पाटोदा येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगासह दोघांना अतुल अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी त्याने बीडमधील उमेदवारांना एकत्रित करून प्रश्नोत्तरे पाठांतर करून घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परीक्षेत पात्र होण्यासाठी फरार दलाल जीवन सानप याच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी संबंधित नातलगावर होती.

अतुल प्रभाकर राख असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अटकेतील भाजपचा पाटोदा युवा मोर्चा अध्यक्ष संजय सानप याचा तो नातलग आहे. त्याशिवाय अर्जुन भरत बमनावत उर्फ अर्जुन राजपूत असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि ‘ड’ अशा दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाटोदा भाजयुमोचा माजी अध्यक्ष संजय सानप याला अटक केली होती. त्याचा भाऊ जीवन सानप हा फरार आहे. आता त्याचा नातलग असलेल्या या प्रकरणातील दलाल अतुल राख याच्या मुसक्या सायबर पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याशिवाय ‘ड’ परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र सानप याला अटक केली.

Team Global News Marathi: