दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा – डॉ अमोल कोल्हे

सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर यांच्यात संघर्ष पेटताना दिसून येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार डॉ अमोल कोल्हे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला घाबरत नाही. मात्र ज्या दोनचार लोकांनी दगडफेक केली असेल त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल. येणाऱ्या काळात भाजपासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

जिकडे कोणीच नाही. निर्मनुष्य ठिकाणी एक दोन कार्यकर्ते सोडून दगड मारुन मी वंचितांचा लीडर आहे, असं भासवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याना घाबरत नाही. मात्र त्यांच्या दोनचार लोकांनी जी दगडफेक केली असेल त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाणार असल्याचं म्हणत कोल्हेंनी भाजपला इशाला दिला आहे. यावर आता पडळकर काय प्रतिरीय देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: