भाजपा आमदाराला जुगार खेळताना रंगेहाथ पकडलं, आमदारांसह २५ जणांना पकडलं |

 

सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने टीमनं घातलेले असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

अशात एका भाजपा आमदाराला जुगार खेळताना अटक करण्यात आली आहे. पंचमहाल पोलिसांनी कारवाई करत एका आमदारासह अन्य २५ जणांना रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी आमदाराच्या एका रिसॉर्टमध्ये एकत्र जमून जुगार खेळत होते. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

संबंधित अटक केलेल्या आमदाराचं नाव केसरी सिंह सोलंकी असून ते गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. काल रात्री केलेल्या छापेमारीत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जुगार आणि रिसोर्टमध्ये मद्यसाठा ठेवण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आमदाराला अटक केली आहे. अवैधरित्या जुगार खेळणं, कोरोनाचं नियम न पाळणं आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत पंचमहाल जिल्हा पोलिसांनी आमदाराला अटक केली आहे.

Team Global News Marathi: