हे सरकार परवानगी नाकारत असेल तर सत्तेत महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल

 

मुंबई | भायखळा राणीबाग ते आझाद मैदान येथे मुंबईत निघणारा मोर्चा हा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. राज्यातील विरोधी पक्षांचा हा मोर्चा नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. हे सरकार जर मोर्चाला परवानगी नाकारणार असेल तर सत्तेवर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल असेही ते म्हणाले. ते सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील असा इशाराही राऊतांनी सरकारला दिला.

उद्या शिवसेना, काणग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्षांचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. अद्याप या मोर्चाला सरकारकडून परवानगी मिळाली नाही. याबाबत संजय राऊत बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही असे राऊत म्हणाले. खरतर सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील होणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले.

एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले. आता औत यांच्या या टीकेला शिंदे-फडणवीस सरकार काय प्रतिकिया देते सुद्धा पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: