कट्टर शिवसैनिकच आला रस्त्यावर; आता विकतोय रस्त्यावर हळद कुंकू

 

यवतमाळ | संघटना वाढीची नशा अंगात भिनलेले कार्यकर्ते यांच्यामुळे नेत्यांना राजकीय पटलावर यश मिळते तसेच नव्या नेत्यांना जन्म देतात. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून तुरूंगात घालवणारा कट्टर शिवसैनिक रस्त्यावर आला आहे. त्यामुळे पक्षासाठी झिजणाऱ्या त्या कार्यकर्त्यांची रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

प्रमोद जाठे असे नेत्यांना घडविणार्‍या शिवसैनिकाचे नाव आहे. शिवसेनेत राहून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. प्रमोद जाठे यांच्या संघर्षातून शिवसेना पक्ष ग्रामीण भागात बळकट झाला. प्रमोद जाठे यांना ओळखत नाही, असा एकही कार्यकर्ता जिल्ह्यात सापडणार नाही. राज्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदी ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्ची मिळवली. परंतु, पक्षासाठी खस्ता खाणारा प्रामाणिक कार्यकर्ता रस्त्यावर आला आहे.

विशेष म्हणजे प्रमोद जाठे आज पक्षात सक्रीय नसले तरी त्यांनी दुसर्‍या कोणत्याही पक्षात जाणे पसंत केले नाही. कधी काळी मालदार म्हणून ओळखला जाणारा आणि पक्षासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करणार्‍या शिवसैनिकावर आज फुटपाथवर बसून हळद-कुंकू आदींसह पुजेचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.

Team Global News Marathi: