बार्शीत ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; गुंडांकडून व्यापाऱ्याला ऑन कॅमेरा खंडणीची मागणी व वसुली ;गुन्हा दाखल

बार्शी :

खडी क्रशर संबधी केलेल्या तक्रारी मिटवण्याच्या बदल्यात बार्शीतील बांधकाम व्यवसायिक सुनिल भराडीया यांना धक्काबुक्की करत यांच्याकडे पाच लाख रुपयाची खंडणीची मागणी करून त्यापोटी पहीला हप्ता म्हणून ५० हजार खंडणीची रक्कम उकळल्या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचे चित्रीकरण कॅमेरात कैद झाले आहे .

फिर्यादी म्हटले सुनिल राधेशाम भराडीया यांचे मुलाचे नावे मौजे ताडसौंदणे हद्दीतीत बार्शी-तांडसौंदणे रोडवर जमीन गट नं. 184/ब मध्ये भराडिया स्टोन क्रेशर आहे. सदर खडीक्रेशरचे सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. सदरचे खडी क्रेशर बेकायदेशीर आहे, आजूबाजूला धुळ होऊन पिकांचे नुकसान होत आहे म्हणून आजू-बाजूच्या शेतकरी लोकांनी 15 दिवसांपुर्वी तहसीलदार, बार्शी यांचेकडे तक्रार केली होती. याबाबत सर्व परवानग्या दाखविल्यानंतर व खडी क्रेशर मशीनला पत्रा मारून घेतल्याने त्यांनी तक्रार मागे घेतली होती.

दि. 11 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुनिल यांचे मोबाईल फोन आला व तुझे लई नाटके झालेत, तुझं क्रेशर बेकायदेशीर आहे, तुझ्या विरुध्द शेतक-यांनी तहसीलदार यांचेकडे तक्रार दिली आहे असे बोलत होता. त्यावेळी त्यांना तुम्ही कोण बोलता असे विचारले असता त्याने बार्शीतून समाधान बोलतो असे सांगितले. त्यावेळी त्यास फिर्यादीने सर्व कागदपत्रे आहेत, तुम्ही येवुन पहा असे सांगितले.

https://fb.watch/b8f3dk94Fs/

त्यावेळी त्याने माझे मागे पत्रकार आहेत, तुला येवुन भेटायला मी का रिकामा आहे का, तुझं क्रेशर बंद कर असे म्हणला. त्यावेळी मी त्यास तुम्ही खडी क्रेशरवर या आपण समक्ष बोलू, सर्व कागदपत्र दाखवतो असे सांगितले .त्यावेळी त्याने मी 5-6 वाजता फोन करतो,जास्त नाटकं करायचे नाहीत असे म्हणून फोन ठेवला.

त्यानंतर सांयकाळी 06/26 वा. परत त्याच इसमाचा त्याच नंबरवरून फोन आला त्यावेळी त्याने मला दादांनी, पत्रकारांनी कागदं दाखवली आहेत, तु येड्यात काढू नको, मी तुला कुठंही गाठू शकतो, आडवु शकतो असे म्हणाला असता फिर्यादी ने साडेसात वाजता खडी केशवर पोहोचतो तेथे तुम्ही या असे सांगितले असता त्याने माझ व पत्रकार लोकांच सगळ्याचं मिटवाव लागेल असा म्हणाला असता मला टाईम द्या सगळं मिटवतो असे म्हणलो.त्यावेळी त्याने तु आज नाही भेटला तर तु उद्याचा दिवस बघत नाही अशी धमकी दिली.

त्यामुळे घाबरुन 07/30 वा. खडी क्रेशरवर जाऊन फिर्यादी थांबले. फिर्यादी रात्री 09/11 वा. त्यास फोन लावून वाट बघत थांबलो आहे असे सांगितले असता त्याने मी बाहेर आलो आहे, मला वेळ लागेल, मी आल्यावर माझ काय असेल मिटव असे म्हणाला. त्यानंतर रात्री १० वा.चे सुमारास फिर्यादीचा मुलगा राघव व त्याचा मित्र सचिन जाधव हे खडी क्रेशरवर आले असता त्यांना वरील घटना सांगितली व क्रेशरवर थांबण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीने सचिन यास सदरचा इसम आल्यावर काय बोलतो, काय करतो याची शुटींग कर असे सांगितले होते. त्यानंतर रात्री 10/30 वा. चे सु.खडी क्रेशरच्याचे ऑफीसमध्ये बसलेलो असताना दोन इसम आतमध्ये आले. त्यातील एका व्यक्तीने फिर्यादीस तुझ्या खडी क्रेशर प्रकरण मिटवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील असा म्हणाला.

त्यावेळी माझा रितसर खडी क्रेशर आहे, त्याच्या सर्व लायसन्स आहेत दाखवु का असे म्हणालो असता त्याने शेतक-याने तुझ्या विरुध्द तक्रार केली आहे, पत्रकार, दादांनी तक्रार केली आहे म्हणत होता. त्यावेळी त्यास मी तुम्ही अधिकारी आहेत काय? असे म्हणालो असता त्याने माझ्या टेबलवरील वस्तु फेकल्याने त्याच्यावर भडकलो असता त्याने माझ्या गच्चीला धरून तु पैसे दे नाहीतर तुला खल्लास करीनं अशी धमकी देत होता. त्याच्या सोबतचा इसम देखील मारण्यास अंगावर धावत होता. मला गच्चीला धरलेल्या इसमाने तु मिटवतो म्हणाला होता पैसे दे असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने कोठे तक्रार नको व जिवाला काही धोका होईल या भितीने ऑफीसमध्ये ठेवलेले 50000/- रु. मधून काढून टेबलवर ठेवले. त्यावेळी त्याने फिर्यादीस प्रत्येक महिन्याला 50000/- रु. द्यायचे असा म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने त्यास तुझ्या सोबतच्या पत्रकार, दादा, बप्पाचे नाव काय असे विचारले असता त्यांच माझं मी बघतो असे सांगून त्याच्या सोबतच्या इसमाने पैसे उचलुन निघून गेला. याबाबत भादवि.384,323,506,34 प्रमाणे गुुन्हा दाखल झाला असुन आरोपीच्या शोधासाठी दोन टिम रवाना अधिक तपास सपोनि शिवाजी जायपात्रे करित आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: