अखंड सौभाग्य देणारी हरतालिका…वाचा शुभयोग

Haratalika पावसाळामध्ये हिरवळ साजरी केल्यानंतर आता भाद्रपद महिन्यात हरतालिका साजरी करण्याची वेळ आली आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका साजरी केली जाते. दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले. आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे ‘अब्रह्मण्यम’ तेव्हा ही या हिमगौरीने ‘जब प्यार किया तो डरना क्या’ ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले. या उपवासाची तयारी सकाळपासून सुरू केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो.

हरतालिका पूजा कधी

भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि Haratalika हरतालिका साजरा करण्यासाठी महिला उपवास करतात. या वर्षि हरतालिका गुरुवार 30 ऑगस्ट 2022 रोजी आहे. तिथी 29 ऑगस्ट दुपारी 03:20 वाजता सुरू होईल आणि 30 ऑगस्ट रोजी दुपारी 03:33 पर्यंत चालू राहील. 30 ऑगस्ट रोजी दोन शुभ मुहूर्त आहे. पहिला सकाळी 6:05 ते सकाळी 8:38 दरम्यान आणि दुसरा सायंकाळी 6:33 पासून सुरू होईल आणि रात्री 8:51 पर्यंत चालेल.

यंदा आला आहे चांगला योग

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी हरतालिका Haratalika शुभ योग हस्त नक्षत्राशी जुळत आहे. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1.03 वाजेपर्यंत शुभ योग राहील. ज्योतिष शास्त्रानुसार या योगात महादेव पार्वतीची पूजा केल्यास विशेष आशीर्वाद मिळतात. यासोबतच सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुसरीकडे, हरतालिका तीजच्या दिवशी संपूर्ण दिवस हस्त नक्षत्र असेल. असे म्हणतात की या नक्षत्रात 5 नक्षत्रे आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत. म्हणून या दिवशी पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते.

खाणे-पिणे टाळावे

हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे. कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतू शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी, गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करु शकतात. तरी या दिवशी दूधाचे सेवन करणे टाळावे. तसेच अन्न घेणे देखील टाळावे. व्रत Haratalika करण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तामसिक भोजन टाळावे. प्रेमाने वागावं, नवर्‍याच्या दिर्घायुष्यासाठी करत असलेल्या व्रत दरम्यान नवर्‍याशी भांडण, वाद करणे टाळावे. नवर्‍याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण तरी कसं होणार. स्त्रिया निर्जलीकरण होऊन हे व्रत पाळतात. असे मानले जाते की हे व्रत पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.

चुकुन करु नये हे काम

हरतालिका Haratalika व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी ग्रहण करत नाही.

एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे.
या दिवशी घर स्वच्छ असावं. घरातील कचरा बाहेर करावा.

रात्री जागरण करुन भजन-कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहे.
शास्त्रांप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका, सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांना देखील करण्याची आज्ञा आहे.

पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूने प्रतिमा तयार करावी.पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील वडिलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा.

दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावे.
हरतालिका तृतीया व्रत दरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर रहावे. या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेंदी लावण्यात येते.

वयस्कर लोकांचा कधीच अपमान करु नये परंतू या दिवशी चुकुन देखील वडिलधार्‍यांना अपशब्द बोलू नये. त्यांचे मन दुखावेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये.

व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही. दिवसा तर झोपू नाहीच परंतू रात्री देखील जागरण करावं. हे व्रत करणार्‍यांनी रात्री जागरण करुन भजन- कीर्तन करावं.

प्रदोष काळात करतात पूजा

प्रदोष काळात हरतालिका Haratalika पूजा केली जाते. प्रदोष काळ म्हणजे दिवसा आणि रात्री भेटण्याची वेळ. हरतालिका पूजेसाठी शिव, पार्वती आणि गणेशजी यांच्या मूर्ती हाताने वाळू किंवा काळ्या मातीने बनवल्या जातात. फुलानी ते सजवले जाते. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. त्याच्या सामोर रांगोळी घातलि जाते. तिन्ही मूर्ती केळीच्या पानावर बसवल्या जातात. सर्वप्रथम कलश बनवले जाते ज्यात एक भांडे घेतले जाते. त्यावर नारळ ठेवा. नंतर दिवा लावावा.

कलशवर स्वस्तिक बनवा आणि वर अक्षता अर्पण केली जाते. कलशची पूजा केली जाते. सर्वप्रथम पाणी अर्पण केले जाते, नाडा बांधला जातो. कुंकु, हळद, तांदूळ अर्पण केले जातात आणि नंतर फुले अर्पण केली जातात.

कलशानंतर शिवजीची पूजा केली जाते. त्यानंतर गणेश जीची पूजा केली जाते. त्यानंतर माता गौरीची पूजा केली जाते. त्यांना पूर्ण शृंगार दिला जातो. यानंतर हरतालिकाची कथा वाचली जाते.
मग सर्व मिळून आरती केली जाते, ज्यामध्ये प्रथम गणेश जीची आरती केली जाते, नंतर शिवजीची आरती केली जाते आणि नंतर माता गौरीची आरती केली जाते. पूजेनंतर देवतेची प्रदक्षिणा केली जाते.
रात्रभर जागून राहिल्यानंतर पाच पूजा आणि आरत्या केल्या जातात. सकाळी शेवटच्या पूजेनंतर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर घेऊन एक विवाहित स्त्री त्या सिंदूरातून स्वतःच्या कपाळाला लावते.
काकडी आणि हलवा दिला जातो. तीच काकडी खाऊन उपवास मोडला जातो. शेवटी सर्व साहित्य गोळा केले जाते आणि नदी किंवा तलावात विसर्जित केले जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: