संपूर्ण राज्यभरात नाही तर देश-विदेशात होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी केली जात आहे. या प्रसंगी आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुद्धा सर्व भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा आपापसातले मतभेद विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्वीट्च्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी हिंदीमध्ये “होली की शुभकामनाएँ।” असा संदेश भारतीयांना तसेच ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सर्व अनिवासीय भारतीयांना दिला आहे.
आज मोठया प्रमाणात उच्च शिक्षित भारतीय नोकरी तसेच व्यवसायनिमित्त ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत राष्ट्रात स्थलांतर झाले आहे. आज भारतीय कुठेही स्थायिक झाला तरी आपली परंपरा आणि सण-उत्सव जपताना दिसून आला आहे. आज देशात नाही तर संपूर्ण जगभारत रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहे.
Wishing our Hindu Australian community, my good friend @narendramodi and all the people who are celebrating it, a happy and colourful Holi!
होली की शुभकामनाएँ। pic.twitter.com/rjz1MA8gHJ
— Scott Morrison (@ScottMorrisonMP) March 28, 2021