रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास ५०० रुपयांचा दंड लागणार

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही मास्क वापराने बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही नागरिक नियमांचे पालन न करत सर्रास मनपा कर्मचारही आणि पोलीस कर्मचारी नजरेस पडल्यास खिशातील रुमाल काढून मास्क म्हणून वापर करताना दिसून आले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. तसेच मास्क म्हणून रुमाल वापरणाऱ्या नागरिकांना चाप बसणार असून रुमालाला मास्क समजण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मास्कच्या ठिकाणी रुमालाचा वापर केल्यास ५०० रुपये दंड लावण्याची घोषणा करण्यात येणार आहे.

लसीकरण न केलेल्या प्रवाशांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचे आवाहन

1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल).

2. जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा.

3. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.

4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करणे टाळा.

5. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.

6. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.

7. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तॉड व नाक झाका आणि वापरलेले पेपर नष्ट करा: जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे.

8. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

9. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा.

10. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.

11. कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

Team Global News Marathi: