मुंबई महापालिकेचा निर्णय, ‘ओमिक्रोन’चा एक रुग्ण आढळला तरी इमारत सील

 

मुंबई | दक्षिण आफ्रिकेसह काही युरोपीय देशांमध्ये लागण वाढलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रोन’ व्हेरिएंटने जगभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेनेही सतर्क होऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळावर होणाऱया चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आल्यास ‘जिनोम सिक्वेंसिंग’ टेस्ट होणार असून नव्या व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त घातक असल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना खबरदारी काटेकोरपणे घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेनेही परदेशातून येणाऱया प्रवाशांबाबत विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना सद्यस्थितीत थेट घरी सोडण्यात येत असले तरी सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटाझेशन आणि गर्दी टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय पालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, कोविड सेंटरचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवाय ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोनाच्या नवा ओमिक्रोन व्हेरिएंट हा इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसरणारा आणि गंभीर स्वरूपाचा आहे. डब्ल्यूएचओने या व्हेरिएंटचे नामकरण ओमिक्रोन असे केले आहे. विशेष म्हणजे ज्यांना आधी कोरोनाची लागण होऊन गेली आहे त्यांना या किषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. क्हेरिएंट दक्षिण आप्रिकेसह बेल्जियम, बोत्सवाना, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांमध्ये आढळून आला आहे.

होम क्कारंटाइन असणाऱयांवर पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. या प्रवाशांना वेळोवेळी फोन करून ते काटेकोरपणे क्वारंटाइन पाळत असल्याची खात्री केली जाईल. नियम मोडल्यास पालिका अशा परदेश प्रवास केलेल्या नागरिकांना क्कारंटाइन सेंटरमध्ये दाखल करेल.

Team Global News Marathi: