‘हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे देवू’, मोहित कंबोज यांची घोषणा

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुडीपाडव्याच्या मशिदीवरील अनिधिकृत भोग्यांमधून चालणाऱ्या अजानविरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले. राज ठाकरेंच्या त्या भूमिकेचे भाजप नेते मोहित कंबोज यांनी यांनी स्वागत केले, तसेच हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत लाऊडस्पीकर(भोंगा) देण्याची घोषणा केली आहे.

भाजपच्या सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, “ज्यांना मंदिरात लाऊडस्पीकर लावायचे आहे, त्यांनी आमच्याकडून मोफत घेऊन जावे. सर्व हिंदूंचा एकच आवाज! जय श्री राम! हर हर महादेव,” असे कंबोज म्हणाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात काय ऑर्डर दिली, याची माहिती मोहित कंबोज व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी भाजप आणि मनसे हिंदुत्व कार्ड खेळताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक, मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावू नयेत, ही मागणी मुळात बाळ ठाकरेंनीच केली होती. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्यही आले आहे. समाजात फूट पाडण्यासाठी अशी विधाने केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Team Global News Marathi: