हाफकिन निर्मित कोरोना लस एप्रिल 2022 मध्ये येणार बाजारात !

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते. मात्र या लसीसाठी भारतीयांना काही काळ थांबावे लागणार आहे.

तसेच लसीच्या निर्मितीसाठी बायोसेफ्टी लेवल -3 लॅब या लसीकरिता उभारावी लागणार आहे. त्याचबरोबर या लास निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून येत्या काळात गरज पडल्यास कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता त्याप्रमाणे माणसे घेतली जातील, असे हाफकिन बायो फार्मसीयूटिकल्सचे व्यस्थापकीय संचालकांनी वृत्त समूहाशी बोलताना सांगितले आहे.

दोन महिन्यापूर्वीच हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकलला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. अखेर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.

Team Global News Marathi: