न्यूज पोर्टलचा संपादक चकमकीत ठार, Editor-in-Chief निघाला दहशतवादी

 

जम्मू | जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका संपादकाचा सुरक्षा दलांनी एन्काऊंटर केला आहे. श्रीनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं यापैकी हा एक दहशतवादी निघाला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांपैकी एक रईस अहमद भट पूर्वी पत्रकारिता करत होता आणि अनंतनागमधील ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’चे ऑनलाइन पोर्टल चालवत होता. दहशतवादी घटनांशी संबंधित अहमद भटवर यापूर्वीच दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

काश्मीर झोन पोलिसांनी रईसचे प्रेस ओळखपत्र जारी केले आहे. हिलाल अह राहा असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून तो बिजबेहारा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो ‘सी’ कॅटेगरीचा दहशतवादी होता. श्रीनगरच्या रैनावरी भागात ही चकमक झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. येथे काही दहशतवादी लपले आहेत.

तसेच लपून बसलेले दहशतवादी काहीतरी प्लान करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दोन्ही दहशतवादी अनेक घटनांमध्ये सामील होते. त्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्याही केली होती.

Team Global News Marathi: