गुरुपौर्णिमा 2022: जाणून घेऊया मुहूर्त आणि खास महत्व

गुरुपौर्णिमा 2022:  जाणून घेऊया मुहूर्त आणि खास महत्व

महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जाणून घेऊया आषाढ पौर्णिमेचा मुहूर्त आणि गुरुपौर्णिमेचे खास महत्व.

वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु. ‘अनुभव’ हा सर्वात मोठा गुरू असतो, असे म्हटले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात.

आषाढ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा बुधवार १३ जुलै रोजी पहाटे ०४ वाजून ०१ मिनिटांनी सुरु होईल. तर समाप्ती बुधवारीच १३ जुलै रोजी रात्री १२ वाजून ०८ मिनिटांनी होईल. त्यामुळे १३ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होईल गुरुपौर्णिमा प्रारंभ १३ जुलै बुधवार पहाटे ०४ वाजून ०१ मिनिटे गुरुपौर्णिमा समाप्ती १३ जुलै बुधवारी सकाळी १२ वाजून ०८ मिनिटे.

गुरुपौर्णिमेचे महत्व

हिंदु धर्मांत महर्षी व्यास आद्य गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते अशी मान्यता आहे. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात.

गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की, ‘ग’ कार म्हणजे सिद्ध होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. म्हणूनच म्हटले आहे…”गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥
जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण”

ग्लोबल न्युज नेटवर्क: