गुणरत्न सदावर्तेंनी स्थापन केली एसटी संघटना, म्हणाले

 

एसटी कर्मचारी आंदोलनातून पुढे आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने मैदानात उडी घेतली आहे. सदावर्ते यांनी एस टी कर्मचारी जनसंघ अशी संघटना स्थापन केली आहे. यावेळी सदावर्तेंनी नथुराम गोडसेजी म्हणत तोंडभरून कौतुक केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी हल्ला प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यानंतर सदावर्ते पुन्हा एकदा कामाला लागले आहे. आज मुंबईत एसटी कर्मचारी जनसंघ अशी संघटना स्थापन केली.

यावेळी बोलत असताना सदावर्तेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या घरी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते. वारंवार आम्हाला सांगण्यात आलं की गिरणी कामगारांसारखी होईल. मात्र आम्ही लढाई लढत राहिलो. गांधीवाद्याांनी देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केलं आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, गांधी यांनी श्वास सोडताना हे राम म्हटलं असं सांगितलं जात आलंय परंतु ज्यावेळी नथुराम गोडसेजी यांची कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होतं की गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटलं नव्हतं, असंही सदावर्ते म्हणाले. आज आम्ही 92 हजार कष्टकरी यांच्यासाठी नवीन पाऊल उचलत आहोत. माझे हे कष्टकरी राज्यातील प्रचारक आहेत हे या सरकारन लक्षात घ्यावं. आम्ही आज एक नवीन संघटनेची घोषणा करणार आहोत. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करणार आहे, असंही सदावर्ते म्हणाले.

Team Global News Marathi: