गुलाबराव पाटलाने सुषमा अंधारेंना थेट ठाकरेंच्या चित्रपटातील नटीची दिली उपमा

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील यन्य जळगावात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर गुलाबराव पाटील अंधारेंवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी टीका करत असताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली असून सुषमा अंधारे यांचा उल्लेख त्यांनी नटी म्हणून केला आहे.

सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती.

ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची बोचरी टीका पाटलांनी केली आहे.

Team Global News Marathi: