एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची नवी ऑफर! आज पार पडणार महत्वपूर्ण बैठक

 

:एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी ऑफर दिल्याचे समजते, एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र सरकारला 1600 कोटींची ही इमारत खरेदी करायची आहे.

यापूर्वी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात, महाराष्ट्र सरकारने केंद्राला 1400 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, केंद्राने एअर इंडियाची इमारत 2000 कोटींना विकण्याची ऑफर दिली. सुत्रांच्या माहितीनुसार, 2018 मध्ये फडणवीस सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यास इच्छुक होते. याचे कारण महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

जर सर्व कार्यालयं या एकाच इमारतीत हलवली, तर कारभारात अधिक पारदर्शकता येईल, तसेच कारभार अधिक गतिमान होईल असे राज्य सरकारला वाटते. एअर इंडिया कंपनी टाटा समूहाला विक्री केल्यानंतर मुंबईतील एअर इंडियाची बिल्डिंग केंद्राच्या अख्यत्यारित आली आहे. ही बिल्डिंग राज्य सरकारला हस्तांतरित करावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. ही बिल्डिंग जर राज्य सरकारला मिळाली तर त्या ठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Team Global News Marathi: