मोठी बातमी | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा पोलिसांचा चोख बंदोबस्त |

 

नागपूर | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपयाचा हप्ता वसुलीचा आरोप लगावलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या घरी ईडीने छापा टाकत कारवाई केली आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे.

दरम्यान अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे. मात्र देशमुख कुटुंबीय घरात आहेत.यापूर्वी देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. तसेच या कारवाई विरोधात देशमुखांनी कोर्टाचे दार ठोकावले आहे.

Team Global News Marathi: