गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; इतक्या लाख रोजगार देणार

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून अशातच पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. दरम्यान, भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा जारी केला आहे.

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. यावेळी गुजरात दिशा देणारी भूमिका आहे. गुजरात ही संतांची भूमी आहे. नव्या संकल्पाने गुजरातचा विकास होईल. भाजप सरकार जे सांगते तेच करते. आम्ही संविधानानुसार चालतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्यानुसार, गुजरातमधील तरुणांना पुढील 5 वर्षांत 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केले जाईल.

जाहीरनाम्यानुसार, 3 सिव्हिल मेडिसिटी, 2 एम्सच्या स्तरावरील संस्था स्थापन करण्यासाठी आणि सध्याची रुग्णालये, सीएचसी आणि पीएचलीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपये महाराजा श्री भागवत सिंह जी आरोग्य कोष तयार केले जाईल. तसेच, 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने, गुजरात ऑलिम्पिक मिशन सुरू होईल आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. गुजरातमधील प्रत्येक नागरिकाकडे पक्के घर असल्याची खात्री केली जाईल.

 

Team Global News Marathi: