माणसाला परिपूर्ण करण्याची ताकद असणारं हे शिक्षणं आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत – चंद्रकांत पाटील

 

 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित २७ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी एक महत्वाची घोषणा केली. १२ नंतरची पदवी आता तीन वर्षांची नसून चार वर्षांची असेल, असे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले, १२ वी नंतरची पदवी तीन वर्षांची नसून आता चार वर्षांची असेल. केवळ आर्टस्, कॉमर्स, आणि सायन्स विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही. ७० टक्के अभ्यासक्रम हा त्या विद्यार्थ्याला ज्यामध्ये करियर करायचे आहे त्यावर असेल आणि ३० टक्के अभ्यासक्रम हा योगा, तत्वज्ञान , मेडिटेशन, म्युसिक, खेळ यासोबतच मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य यावर असेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले कि, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची एक डिग्री असेल ज्यामध्ये मल्टि एन्ट्री आणि मल्टी एक्सिट आहे. दोन वर्षांनंतर त्याला असे वाटले कि आता थांबले पाहिजे तेव्हा त्या दोन वर्षांमध्ये त्याला मिळणारे जे पॉईंट्स आहेत ते त्याच्या डिजिटल बँक मध्ये जमा होतील. ज्यावेळी तो लंडन युनिव्हर्सिटी मध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी जाईल तेव्हा त्याला हे मार्क्स उपयोगी पडतील . यासाठी सगळ्या जगाच्या विश्वविद्यालयांसोबत आपले टायअप सुरु आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

तसेच माणसाला परिपूर्ण करण्याची ताकद असणारं हे शिक्षणं जे घोकंपट्टी करणार शिक्षण नसेल, असे शिक्षण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत . आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे कि, हे ऑप्शनल आहे का?, तर नाही. जून २०३० नंतर तर हे अनिवार्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला प्रा.डॉ. मोहन केशव फडके आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व प्रा.दत्ता दंडगे उपस्थित होते.

Team Global News Marathi: