गुवाहटीत तृणमूल काँग्रेसचं आंदोलन, पूर असताना महाराष्ट्राचे आमदार आलेच कसे?

 

महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद आता आसाममध्ये उमटू लागले आहेत. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट गुवाहाटीत तळ ठोकून आहे. त्याचवेळी आसाममध्ये प्रचंड पाऊस झाल्याने पूर परिस्थिती आहे. येथील सरकारने जनतेला मदत करण्याऐवजी शिवसेनेतून आलेल्या आमदारांना संरक्षण पुरविण्यात गुंतले आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. यावेळी गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन केले. आसाममध्ये पूर असताना आमदार आलेच कसे, असा सवाल तृणमुलने भाजपला केला आहे.

महाराष्ट्र राजकारणाचे सध्याचे केंद्र आसाममधील गुवाहााटी येथील हॉटेल आहे. गुवाहााटी येथील बॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सध्या महाराष्ट्रातील 42 आमदार आहेत. त्यात शिवसेनेचे 35 आमदार आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी बॅडिसन ब्लू हॉटेलसमोर निदर्शने सुरु केली. पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. आसाम तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आसाममधील भाजप सरकार राज्यातील पूरस्थिती असताना महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा खर्च करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. योगायोगाने आसाममध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे 5.5 दशलक्ष लोक प्रभावित झाले. गेल्या दिवसभरात आलेल्या पुरात एकूण 69 जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात, शिवसेनेच्या आमदारांच्या गुवाहाटीत आगमनाबाबत काल मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा म्हणाले, ‘आसामसाठी पर्यटकांची आवक चांगली आहे. राज्य कर वसूल करू शकेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत.

Team Global News Marathi: