नितीन देशमुख पळून नाही तर सन्मानाने परत गेले, शिंदे गटाकडून सडेतोड प्रतिउत्तर

 

सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आज 40 पेक्षा जास्त आमदारांचा संख्याबळ आहे हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर बंडखोर आमदारांसोबत गेलेले गुवाहाटी येथून परतलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले. त्यांनी कशापद्धतीने वागवण्यात आले याचा वृत्तांत यांनी माध्यमांसमोर मांडला. नितीन देशमुख म्हणतात मी पळून आलो परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे दावे खोटे असल्याने सांगण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून नितीन देशमुख चार्टर फ्लाइटमधील रिलीज करण्यात आले आहेत. त्यांचे कोणीही अपहरण केले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मुंबईत पोहोचवल्याचे फोटो नितीन देशमुख यांना व्यवस्थित पाठवल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शिंदे गटाकडून त्यांचे अपहरण झाले नसल्याचेही सांगण्यात आले.

मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो, पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. असे देशमुख म्हणाले.

Team Global News Marathi: