गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे मार्फत हॉटेल आणि बारकडून १०० कोटीच्या हप्ता वसुलीचा खळबळजनक आरोप लावला होता. या आरोपानंतर भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभरात एकचं गोंधळ घातला होता.

आता यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुखांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते असे ट्विट यांनी केले आहे.

या पत्रकात देशमुख म्हणतात की, राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Team Global News Marathi: