सन 2600पर्यंत मानव होणार अमर, पृथ्वीवर परत येऊ शकतील मृत्यू पावलेले लोक

मानव प्रदीर्घ काळापासून अमरत्व प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. मानवाचा दावा आहे की काही लोक अमरत्व मिळवण्यात यशस्वीही झाले आहेत. मात्र सत्यतेत अमरत्वापासून मानव खूप दूर आहे. पण आता एका रशियन शास्त्रज्ञाने दावा केला आहे की जर मानव योग्य दिशेने चालत राहिला तर तो अमरत्वही मिळवू शकतो. इतकेच नव्हे तर आपल्या शक्तींचा वापर करून तो मृत व्यक्तींनाही परत बोलावू शकतो.

मृत्यू झालेल्या लोकांना पृथ्वीर परत आणू शकणार मानव

रशियाचे एलेक्सेई तुर्चिन हे एक ट्रांसह्यूमॅनिस्ट आहेत. त्यांनी म्हटले आहे की मानव भविष्यात आपल्या मृत प्रियजनांना पृथ्वीवर परत बोलावू शकेल. मात्र त्यांनी म्हटले आहे की यासाठी मानवाला आपल्या प्रत्येक हालचालीचा रेकॉर्ड ठेवावा लागेल जेणेकरून गरज पडल्यास आपल्या हालचाली, आपल्या आठवणी, अनुभव इतरांच्या शरीरात घालता येतील. यासाठी ते आपल्या सर्व हालचाली रेकॉर्ड करून एका सर्व्हरमध्ये स्टोअर करत आहेत जेणेकरून भविश्यात आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांना पुन्हा जिवंत करता येईल.

रीसर्च पेपर केला प्रकाशित

एलेक्सेई तुर्चिन हे स्वतःला ट्रांसह्यूनिस्ट म्हणवून घेतात. अमरत्वाची प्राप्ती कशी करून घ्यावी याबद्दलचा एक रीसर्च पेपरही त्यांनी प्रकाशित केला आहे. याचे नाव Classification of Approaches to Technological Resurrection for the Foundation Science for Life Extension असे आहे. त्यांनी आपला सहकारी स्कॉलर माक्सिम चेर्न्याकोव यांच्यासह हा पेपर लिहिला आहे. याला त्यांनी “Immortality Roadmap” म्हटले आहे ज्यात त्यांनी अमरत्व मिळवण्याचे 4 वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. सोबतच असेही सांगितले आहे की पहिला मार्ग हा पूर्णपणे योग्य आहे तर इतर तीन मार्ग हे बॅकअप प्लॅन आहेत. यात त्यांनी मृत व्यक्तींना परत आणण्याच्या पद्धतीही सांगितल्या आहेत.

मृत्यू हा अटळ

डेलीस्टारच्या बातमीनुसार या रीसर्च पेपरमध्ये साफ लिहिले आहे की मानवाकडे अद्याप मृत्यूचे कोणतेही उत्तर नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि तो येणारच. पण मृत्यूनंतर मानवाला जर स्वतःशी संबंधित माहिती ठेवता आली तर येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तो स्वतःला कृत्रिम शरीरात उतरवू शकेल, म्हणजेच त्याचे मॅपिंग करू शकेल. याप्रकारे मृत्यूनंतरही मानव अमर होईल.

साभार टाइम्स नाऊ मराठी

ग्लोबल न्युज नेटवर्क: