ग्रामपंचयतीच्या निकालानंतर पंकजा मुंडेंनी ट्वीट करून केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन

 

आज राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, निवडणुकीचा निकाल पूर्ण समोर येणे आणखी बाकी आहे. मात्र आतापासून भाजपकडून विजयाची भाषा करण्यात येत आहे.भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर ट्विटवरून विजयाचे ट्विट केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी,ग्रामपंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले आहे.

 

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यापैकी बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होत आहे. तर दुसरीकडे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी या पॅनलचा धुव्वा उडवत काकाला धोबीपछाड दिली. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायती वर आपला झेंडा फडकवला होता.

Team Global News Marathi: