ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं वर्चस्व, शिवसेनेला मोठा धक्का

 

महाराष्ट्रामध्ये सत्तासंघर्षानंतर ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

608 ग्रामपंचायतींपैकी 51 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत 112 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. भाजपने सर्वाधिक 56 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 29 जागा जिंकल्या आहेत.तर शिंदे गटाने 12 जागांवर बाजी मारली आहे. काँग्रेसने 12 जागा जिंकल्या आहे. तर शिवसेना ही चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. शिवसेनेनं आतापर्यंत 4 जागांवर बाजी मारली आहे.

त्याआधी ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी १५ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने ४ तर शिवसेनेनं २ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ६ जिंकल्या असून इतर ९ जागांवर विजयी झाले आहे. महाविकास आघाडीने एकूण २३ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गट युतीने १९ जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान, नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २,भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे.

Team Global News Marathi: