“झारखंड सरकार पाडण्याचा केंद्राचा डाव, बावकुळेंसह मोहित कंबोज यांचंही एफआयआरमध्ये नाव”

 

सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चकमक सुरु झालेली असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी थेट भाजपवर आरोप लागले आहे.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. झारखंड पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. झारखंडचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती असताना झारखंड सरकार पाडण्याचा केंद्र सरकार डाव आखत आहे. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे आली आहेत, असं मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: