राज्यपालांना राजकारणाची एवढी खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा – नाना पटोलें

 

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २६ जुलैला कारगिल दिनानिमित्त एका आयोजित कार्यक्रमात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली आहे.

कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत. त्या संस्कारातून ते राज्यपाल पदावर असतानाही बाहेर आलेले दिसत नाहीत. राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि राजकीय वक्तव्ये करावीत, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज्यपालांना फटकारलं आहे.

राज्यपालपद हे प्रतिष्ठेचं पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे परंतु हे कोश्यारींच्या वर्तनातून दिसत नसल्याचं पटोले म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहमंत्रालयाने कोश्यारी यांना परत बोलावावं, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Team Global News Marathi: