मुंबई | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करमुक्त आले आहे. त्याच निमित्ताने कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क काढला. यावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
”राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.ते आम्हाला शपथ देतात, तो त्यांचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकारावर बोलण योग्य नाही. म्हणून अजित पवारांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळलं आहे मात्र दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गात राज्यपाल कोश्यारी यांच्या या वर्तणुकीवर सर्व स्थरातून टीका होताना दिसत आहे.