राज्यपाल भगतसिह कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर !

 

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुरग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिह कोश्यारी दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा करणार आहे.

चिपळूण दौरा केला. त्यानंतर आता राज्यपालही चिपळूणला जात आहेत. त्यासोबतच दरड कोसळून गिळंकृत झालेल्या तळीये गावाचीही पाहणी कोश्यारी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे.

तसेच महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा, तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशा पद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 

Team Global News Marathi: