सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा – छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला काही प्रश्न विचारले आहे. आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचा आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आली आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिद्ध केल्यानंतर, उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही.

त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण, सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: