सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये – बाळा नांदगावकर

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. एकीकडे युद्ध पातळीवर कोरोना लसीकरण सुरु असताना दुसरीकडे मात्र रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. यावर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य करत सरकारला सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन वरून त्यांनी सरकारचे कांन टोचले आहे.

राज्य सरकारने सरसकट लॉक डाउन चा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावली ची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा. तसेच बाकी अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रा पेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे , हा ही सरकार साठी संशोधनाचा विषय आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे,

तसेच पुढे ते म्हणतात की, ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्युदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावे. आधीच आर्थिक दृष्टया त्रस्त जनतेला लॉक डाउन करून अडचणीत आणू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: