मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयाने जिंकू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई : मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी  व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयाने जिंकू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा संघटनाच्या सर्व प्रतिनिधींना दिली होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेत जे मुद्दे मांडले त्याची दखल घेण्यात आली आहे. आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत. आरक्षणाची हा खटला आता वेगळ्या वळणावर आला आहे.

खासगी याचिकाकर्ते यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे. तसेच आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडण्याची त्यांना संधी मिळाली आहे. ज्या खासगी याचिकाकत्र्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शासनाबरोबर संघटनात्मक कार्य पद्धतीने एकेक मुद्दा मांडून समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत असे आव्हान मुख्यमत्र्यांनी केले आहे.

या बैठकीला मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी यावेळी उपस्थित होते.

Team Global News Marathi: