झारखंड मधील सरकार पाडण्यामध्ये सहभाग असल्याप्रकरणी भाजपच्या माजी मंत्र्याला नोटीस !

 

झारखंडमधील आमदारांची खरेदी आणि तेथील सरकार पाडण्याच्या कटप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींच्या कबुलीजबाबामध्ये महाराष्ट्रातील भाजा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सह जणांचा समवेश असल्याचे मान्य केल्यामुळे लवकरच बावनकुळे यांच्यासह ६ जणांना रांची पोलीस नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

बावणकुळे, ठाकूर यांच्यासह हाॅटेल लीलेकमध्ये वास्तव्याला राहिलेले जयकुमार बेलखेडे, मोहित कंबोज, आशुतोष ठक्कर, अमितकुमार यादव यांना रजिस्टर्ड नोटीस पाठविली जाणार आहे. निर्धारित वेळेत नोटीसला उत्तर न मिळाल्यास या सर्वांना प्रतिवादी बनविले जाईल

रांची पोलीस या सहा लोकांचे जबाब नोंदवणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे. चंद्रशेखर बावणकुळे, ठाकूर यांच्यासह एनएसजीचे माजी सहायक कमांडर जयकुमार बेलखेडे, भाजपचे नेते मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर, अनिल जाधव यांची पोलीस चौकशी करणार आहेत. याप्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र दोनच दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.

Team Global News Marathi: