आमच्या पंतप्रधानांनी ७०० कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले? विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक सुरु  

 

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या पुसाळधार पावसामुळे अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेचच अनेक ठिकाणी दरडी कोसळून निष्पाप लोकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्राने ७०० कोटीची मदत महाराष्ट्राला देऊ केली होती. त्यावरून आता नितेश राणे आणि विजय वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे साहेबांना पाहणी करण्याची परवानगी दिली. त्यापद्धतीनं राणे आले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील होते. त्यांनी केंद्रात माहिती पाठवल्याप्रमाणे केंद्राने तातडीनं ७०० कोटीची मदत पाठवली. आमच्या पंतप्रधानांनी ७०० कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं, अशी टीका देखील नितेश राणे यांनी केली आहे. राज्यात जुन ते ऑक्टोबर २०२० दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत केंद्राने आता जुलै अखेर घोषित केली. ३७२१ कोटी रुपयांच्या मदतीची राज्यातील शेतकऱ्यांना गरज असताना घोषित झालेली ७०० कोटींची मदत ही तुटपुंजी आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

Team Global News Marathi: