“सरकारने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली; अतुल भातखळकर यांबी साधला ठाकरे सरकारवर निशाणा !

 

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून ११,५०० कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती, मात्र याच पॅकेजवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधत टीका केली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या कथित ११५०० कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये मुंबईतील बाधितांच्या मदतीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसून, सर्वसामान्य मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याची टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

१६ ते १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

२००५ साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ नजर पंचनामे करून महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना मदत करतानाच मुंबईतील बाधितांना सुद्धा मदत करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. परंतु केवळ मतांसाठी ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्या ठाकरे सरकारने करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या मुंबईकरांना मदतीच्या नावाने ठेंगा दाखविण्याचे काम केले आहे.

Team Global News Marathi: