गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सडेतोड प्रतिउत्तर

 

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही अशी टीका केली होती. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पडळकर यांनी केलेल्या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पडळकरांच्या टीकेसंदर्भात अमोल मिटकरींनी माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. “पडळकरांना दुसरा काही धंदा नसल्याने पवार यांचं नाव घेऊन लोकप्रियता मिळवायची हा त्यांचा एक धंदा असल्याचा टोला लगावला. पुढे बोलताना त्यांनी “कसं आहे की दुसरा काही धंदा नाही. लोकप्रियतेसाठी पवारसाहेबांचं नाव वापरणं हा एक धंदा आहे. त्यांना स्वत:ला अनुभव आहे. बारामतीत डिपॉझिट का गेलं याचं उत्तर द्यावं किंवा नगरपंचायतमध्ये डिपॉझिट का जप्त झालं याचं उत्तर द्यावं. त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत द्यावी असं मला वाटतं नाही,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, इंदापूरमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबदल्ल बोलताना, “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यात काय गंमत होते ठाऊक नाही. एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते काही दिवसांनी पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, म्हटलं होतं. या विधानावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. पडळकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी उदाहरणं देत पवारांवर टीका केली.

Team Global News Marathi: