गुगलच्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची धमकी, कंपनीने थेटच सांगितले

 

येत्या तीन महिन्यांत कपंनीचे निकाल चांगले आले नाहीत, तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागेल, अशी धमकी गुगल या नामांकित कंपनीने दिली आहे. गुगल कंपनीच्या सेल्स टीमने गुगल कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण विक्रीची उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांची उत्पादकता पाहून थेट नोकरी जाण्याचा इशारा दिला आहे.

गुगुल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच असे वक्तव्य केले होते की कंपनीकडे खूप कर्मचारी आहेत, मात्र त्या तुलनेत काम बरेच कमी आहे. पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याचा सल्ला दिला होता. आपले उत्पादन अधिक चांगले करण्यासाठी आणि ग्राहकांना मदत करण्यावर लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना केले होते. आता बिझनेस इनसायरच्या अहवालानुसार, गुगल कंपनीतील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा देण्यात आला आहे.

गुगलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की, येत्या काळात चांगले काम करुन दाखवा, अन्यथा कंपनी घेईल त्या कठोर निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मॅनेजमेंटनेही कर्मचाऱ्यांना कपातीसाठी तयार रहा, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. पुढच्या तिमाहीत कंपनीला किती उत्पन्न होणार, त्यावर कपात होणार की नाही ते ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलेले आहे.

Team Global News Marathi: