अजून सुरुवातही झाली नाहीये आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. शिवसेनेच्या एका आमदाराने शिसैनिकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा पवारांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बागर यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. या घटनांवर अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचं समर्थन करतात का? असा सवाल अजित पवारांनी केली. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय? असे सवाल अजित पवारांनी केले आहेत. हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशाप्रकारची भाषा वापरत आहेत.

 

तसेच शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत? कुठे शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र, कुठे आपले पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करताना कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजेत, असं शिकवलं त्याच यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रामध्ये तोडा-फोडा-मारा ही पद्धत वापरली जातेय.

Team Global News Marathi: