रिक्षा चालकांसाठी खुशखबर! या तारखेला होणार बँक खात्यात १५०० रुपये जमा

मुंबई । कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना येत्या शनिवारपासून (ता. २२) दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

यासाठी रिक्षाधारकांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी ‘आयसीआयसीआय’बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल.

दरम्यान, ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे.

Team Global: