Good News : कोरोना रुग्ण 7 दिवसांत बरा होणार, झायडस कॅडिलाच्या औषधाला मंजुरी

कोरोना महामारीने अवघा देश त्रस्त झाला असताना काहीशी दिलासादायक बातमी झायडस कॅडिला या कंपनीने दिली आहे. झायडस कॅडिलाच्या ‘विराफीन’ या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. हे औषध घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अवघ्या सात दिवसांत निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

झायडस कॅडिलाने जाहीर केलेल्या चाचणी अहवालानुसार ‘विराफीन’च्या एकाच डोसचे इंजेक्शन घेतल्यानंतर सात दिवसांत 91.11 टक्के कोरोना रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी झाली. तसेच रेस्पिरेटरी डिस्ट्रेसही  कमी झाला आहे. या औषधाचा वापर करण्याची परवानगी आता डॉक्टरांना दिली आहे.

झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी.  हिपेटायटिस सी साठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. 10 वर्षांपूर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: