माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, वाढणार अडचणी !

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लागलेल्या १०० कोटीच्या हप्ता वसुली आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच अनिल देशमुख यांची 14 एप्रिल रोजी जवळपास CBI ने जवळपास दहा तास चौकशी केली होती. सकाळी 10 वाजता चौकशीसाठी गेलेले अनिल देशमुख सायंकाळी 6 वाजल्यानंतर घराकडे रवाना झाले होते.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना एपीआय सचिन वाझे याच्याकरवी मुंबईतील बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांकडून तब्बल 100 कोटी रुपये आणून देण्याची मागणी केली होती असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर आरोपाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या पाच जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार आधी CBI ने परमबीर सिंग, निलंबित एपीआय सचिन वाझे, मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर १४ एप्रिल रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावे असे समन्स सीबीआयने बजावले होते. या झालेल्या चौकशीवरूनच देशमुखांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

Team Global News Marathi: