सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, 16 मार्च : ग्लोबल मार्केटमध्ये गोल्ड रेट कमी झाल्याने आज बुधवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी दर (Gold-Silver Rate) स्वस्त झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोने दरात 144 रुपयांची (Gold Price Today) घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांत सोने दरात जवळपास 4000 रुपयांची कमी आली आहे.

MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा वायदे भाव 144 रुपयांनी कमी होऊन 51,420 रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. MCX वर चांदीचा भावही उतरला आहे. आज चांदीचा भाव 372 रुपयांनी कमी झाला. या घसरणीसह चांदीचा भाव 67,953 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. जवळपास एक महिन्यात पहिल्यांचा चांदीचा भाव 68000 रुपयांवरुन खाली आला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा वाढल्याने सोने-चांदी दरात ग्लोबल लेवलवर कमजोरी आहे. क्रूड ऑइलचा भावही काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे. आता गुंतवणुकदार सोन्याऐवजी बाजारात गुंतवणूक करत असल्याने याचा परिणाम सोने-चांदीवर होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: