नवी दिल्ली : स्थानिक बाजारात सोमवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरूवारी सोन्याचा भाव 496 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे.
या वाढीमुळे सोन्याचा भाव 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 49,801 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला आहे. सिक्युरिटीनुसार मजबूत वैश्विक कलामुळे सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली.
चांदीच्या भावात सोमवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये 2,249 रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे चांदीची किंमत 69,477 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 67,228 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा हाजीर भावात सोमवारी सोन्याचा भाव 496 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचा वैश्विक भाव गुरूवारी वाढीसह 1,898 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसत होता. चांदीची वैश्विक किंमत गुरूवारी 26.63 डॉलर प्रति औंसवर स्थिर ट्रेंड करत होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनिलिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, भारतीय रुपया सोमवारी सुरूवातीला डॉलरच्या तुलनेत १७ पैसे कमकुवत झाल. त्यामुळे एक डॉलरसाठी 73.73 रुपये मोजावे लागले.
महाराष्ट्रात सोने महाग, चांदीत जबरदस्त वाढ
सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 650 रुपयांनी वाढ झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,370 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 49,370 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 49,720 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 48,720 रुपयांवर बंद झाला होता.
सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून महाराष्ट्रात चांदीच्या दरात 2800 रुपयांची वाढ झाली आहे. काल 67,900 वर असलेली चांदी आजही 70,700 रुपयांवर विकली जात आहे.