गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे – संजय राऊत

 

मुंबई | आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाच्या सुरु असलेल्या खुरापतीवर शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. सरकारने यासाठी आता रणनीती आखण्याची गरज आहे असं मत त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना बोलताना व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Team Global News Marathi: