‘गोडसे जिंदाबाद’ म्हणणारे देशालाच लाजवताहेत, भाजपा खासदाराने सुनावले खडेबोल

 

नवी दिल्ली | देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात येत असतं दुसरीकडे सोशल मिडीयावर ‘गोडसे जिंदाबाद’ चा ट्रेंड दिसत आहे. सोशल मिडीयावरील या ट्रेंडवर भाजप नेते वरुण गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला ‘गोडसे जिंदाबाद’ चा नारा देत असा ट्रेंड करणारे देशाची लाज घालवत असल्याचे ट्विट वरूण गांधी यांनी केले आहे.

वरून गांधी म्हणाले की, भारताला महात्मा गांधींनी आपल्याला नैतिकदृष्ट्या सक्षम बनवले. आज हीच आपली जागतिक ओळख आहे. मात्र, काहीजण गांधी जयंतीलाच ‘गोडसे जिंदाबाद’ चा नारा देत देशाची लाज घालवत आहे आणि ते अशा प्रकारे देशाची बदनामी करत आहेत, असे वरुण गांधी म्हणाले.

खासदार वरुण गांधी यांचे हे ट्विट अडीच तासात अडीच हजार वेळा रिट्विट करण्यात आले आहे. या ट्रेंडवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटना लाजीरवाण्या आणि बदनामी करणाऱ्या असून ट्विटरने असे हॅशटॅग चालवू नयेत, अशी मागणी केली आहे. वरुण गांधी यांनी संताप व्यक्त केल्यानंतरही ‘गोडसे जिंदाबाद’ हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत होता.

गोडसे जिंदाबाद हॅशटॅग प्रकरण काय?

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच हॅशटॅग गोडसे जिंदाबाद ट्रेंडिंगमध्ये आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करत गोडसे कौतुक करणाकरे ट्वीट केले जात आहे. महात्मा गांधी यांची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचा हॅशटॅग गोडसे जिंदाबाद वापरून जय जयकार करणारे भरपूर केले जात आहेत. महात्मा गांधींची हत्या करून गोडसे खूप चांगलं काम केलं, असा सूर यातून उमटल्याचं बघायला मिळत आहे.

Team Global News Marathi: