कृषी कायद्यांना विरोध हे राजकीय कपट, पंतप्रधान मोदी यांनी साधला विरोधकांवर निशाणा

 

नवी दिल्ली | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाहीये. याच पर्श्वभूमीवर आता कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे. देशातील केंद्रीय कृषी कायद्यांना होणारा विरोध हा राजकीय कपटाचा भाग असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला आहे. अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

तसेच सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला तयार असून सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असल्याचंही ते म्हणाले. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यांना स्वतःचा दुटप्पीपणा लपवता येऊ शकत नसल्याचा घणाघात त्यांनी केला. काय म्हणाले पंतप्रधान मोदी जे लोक केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करत आहेत, ते राजकीय कपट असल्याचं स्पष्टपणे दिसेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ओपन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

आधार कार्ड, जीएसटी, कृषी कायदे आणि संरक्षण दलाशी संबंधित गोष्टींबाबत राजकारण करणं दुःखद आणि दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. विरोधकांनीच दिलं होतं आश्वासन केंद्र सरकारने जे कृषी कायदे आणले, त्याच कायद्यांचं आश्वासन विरोधकांनीही दिलं होतं. मात्र केवळ राजकीय विरोधासाठी या कायद्यांवर टीका होत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशाच प्रकारचे कायदे आणण्याची सूचना करायची आणि केंद्रानं आणलेल्या त्याच कायद्यांना विरोध करायचा, ही दुटप्पी चाल जनता ओळखून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: