उसाला एकरकमी एफआरपी द्यावी; अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू

 

मुंबई | उसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेक्नावेर आरोप-प्रत्यारोप झाडायला सुरवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी राज्य विधिमंडळ प्रवेशद्वारावर रयत क्रांती संघटनचे प्रमुख सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केलं. तसेच राहिलेल्या उसाला हेक्टरी ५० हजार रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आज विधानभवनाच्या परिसरात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार सुधीर पारवे उपस्थित होते. राज्यातील अनेक कारखानदारांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत, अशा राज्यातील सर्व कारखानदारांवर सरकारने कारवाई करुन शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे द्यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

विधिमंडळ परिसरात ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केलं. राज्य सरकार FRP बाबत अजूनही शेतकऱ्यांना न्याय देत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP एकरकमी मिळालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Team Global News Marathi: